पाच स्थरात काय सुरू, काय बंद?
पहिला स्तर:
या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. Mall, Theatres, Multiplex, Restaurants खुली होणार लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी. जमावबंदीही नाही.
दुसरा स्तर:
यात सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. Mall, Theatres, Multiplex, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेने सुरू. Restaurants ५० टक्के क्षमतेने परवानगी. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. जमावबंदी लागू असेल.
तिसरा स्तर:
सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.
चौथा स्तर:
अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
पाचवा स्तर:
अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील. ३, ४ आणि ५ या स्तरांतील भागात इतरही अनेक निर्बंध कायम राहणार आहेत.
तुमचा जिल्हा / शहर कोणत्या स्तरात?
स्तर पहिला :-
Ahmednagar, Chandrapur, Dhule, Gondiya, Jalgao, Jalna, Latur, Nagpur, Nanded, Yavatmal.
स्तर दुसरा :-
हिंगोली, नंदुरबार.
स्तर तिसरा :-
मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, गडचिरोली, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, वर्धा, वाशिम.
स्तर चौथा :-
पुणे, बुलडाणा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग.
स्तर पाचवा :-
20 टक्यांपेक्षा अधिक पॉझिटिव्हिटी रेट असेल आणि 75 टक्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड भरलेले असतील.
(यामध्ये सध्या कोणताही जिल्हा नाही)
तुमचा जिल्हा पूर्ण अनलॉक झाला असल्यास परीक्षा ऑफलाईन होणार का?
राज्यात अनलॉक ची प्रक्रिया चालू झाल्यापासून अनेक विध्यर्थ्यांना प्रश्न पडत आहे की आपल्या जिल्ह्यात अनलॉक झाले असल्यास आपली परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन तर मित्रानो MSBTE च्या परीक्षा या ऑनलाईन च होणार आहेत कारण त्याबाबतीत MSBTE ने GR सुद्धा काढलेला आहे त्यामुळे काळजी करू नये MSBTE च्या परीक्षा या ऑनलाईन च होणार जर तुम्हाला परीक्षा कॉलेज वर जाऊन द्यायच्या असतील तर तुम्ही देऊ शकता त्यासाठी तुम्हाला कॉलेज ला संपर्क करावा लागेल